
(यश नवले पौड) पुणे:- पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या प्रास्तावित रिंग रोड लगत असलेले 117 गावांच्या नियोजित विकासासाठी सविस्तर विकास आराखडा (डीपी) तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) असती किंवा ती जमीन वापराचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे…
भविष्यातील प्रकल्प आणि त्यासाठी लागणाऱ्या जागांची नियोजन सध्या अंतिम टप्प्यात सुरू असून पुढील चार ते पाच महिन्यात डीपी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पुढील काळात ठेवण्यात आले आहेत. राज्य सरकारने सुमारे दोन वर्षापासून या 117 गावांसाठी (एमएसआरडी) ला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून जबाबदारी दिली होती.. हवेली, भोर, पुरंदर, वेल्हे, आणि मुळशी तालुक्यातील या गावांना अधिक समाविष्ट सांस्कृतिक, पर्यटन, आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने नियोजनबद्ध विकास करण्याचा विचार केला आहे..
या विकास आराखड्यात पुरंदर विमानतळा, जवळील सासवड, आणि सिंहगड किल्ला, या परिसर हे दोन प्रमुख (ग्रोथ) सेंटर म्हणून विचार घेण्यात येत आहे. रिंग रोड मुळे कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर होणारे नागरीकरण व्यवसाय, वाढ, आणि पर्यटन यांच्या विचार करून जमिनीचे वापराचे नियोजन पुढील काळामध्ये केले जाणार आहे..
मुळशीतील डोंगर-दर्याच्या भागात भूभाग लक्षात घेऊन पर्यटनाला विशेष प्राधान्य देण्याचा विचार आहे औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्कसाठी योग्य जागांचा ही शोध घेतला जात आहे. डीपी किंवा रस्ते आणि बांधकाम पुरता मर्यादित न ठेवता पाणीपुरवठा, टाक्या, क्रीडांगण, खुल्या जागा, स्मशानभूमी, अग्निशन केंद्र, आणि सांडपाणी या प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा आरक्षित करण्याची नियोजन करण्यात आले आहे..




