
पौड प्रतिनिधी
मुळशी : मुळशी धरणग्रस्तांच्या प्रलंबित २१ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. हक्काचे पाणी, पुनर्वसन आणि मूलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी धरणग्रस्तांनी एकजूट होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या आंदोलनात पिण्यासाठी व शेतीसाठी २ टीएमसी पाणी, धरणग्रस्तांचे पुनर्वसन, रस्ते, शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच इतर मूलभूत सुविधांच्या मागण्यांचा समावेश आहे. अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी धरणग्रस्तांकडून हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
हे आंदोलन सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता बालेवाडी स्टेडियम, ऑर्किड हॉटेलशेजारी, मुंबई-बेंगळुरू महामार्ग क्रमांक ४८ येथे होणार आहे.
या आंदोलनात मुळशी तालुक्यातील सर्व नागरिक, धरणग्रस्त बांधव, शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





