
पौड प्रतिनिधी
पौड : मुळशी धरणग्रस्तांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न, तसेच धरणग्रस्त गावांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुळशी धरणग्रस्त कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागण्यांसंदर्भात समितीच्या वतीने टाटा पॉवर कंपनीला सविस्तर निवेदन देण्यात येणार असून, मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुळशी धरणग्रस्तांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न, तसेच धरणग्रस्त गावांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुळशी धरणग्रस्त कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागण्यांसंदर्भात समितीच्या वतीने टाटा पॉवर कंपनीला सविस्तर निवेदन देण्यात आले असून, मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
समितीने दिलेल्या निवेदनानुसार, मुळशी धरणातील पाण्यापैकी २ टीएमसी पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी उपलब्ध करून देणे, तसेच मुळशी धरणग्रस्तांच्या १०५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. या मागण्यांसाठी १६ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू करण्यात आलेले उपोषण आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले होते. मात्र, धरणग्रस्तांच्या मागण्यांबाबत अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने समितीने पुन्हा एकदा कंपनीकडे पाठपुरावा सुरू केला आहे.मागण्यांसाठी १६ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू करण्यात आलेले उपोषण आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले होते. मात्र, धरणग्रस्तांच्या मागण्यांबाबत अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने समितीने पुन्हा एकदा कंपनीकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
समितीने निवेदनातून एकूण २१ प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये मुळशीकरांना पिण्यासाठी व शेतीसाठी २ टीएमसी पाणी उपलब्ध करून देणे, जलशुद्धीकरण केंद्रासाठी वळणे येथे पाच एकर जागा देणे, धरणग्रस्तांना हक्काची गावठाणे व घरांसाठी जागा उपलब्ध करून देणे, माले येथील आयटीआय संस्थेसाठी अनुदान, शाळा व महाविद्यालयांसाठी जागा, धरणग्रस्त गावांना सीएसआर निधी, तसेच रस्ते, स्मशानभूमी, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागण्यांचा समावेश आहे.
याशिवाय आदरवाडी येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्थानिक तरुणांना टाटा कंपनीत रोजगार, मुळशी ते माले विद्युतदाहिनी, माले येथे मुलांसाठी खेळाचे मैदान व बगीचा, ओला-सुका कचरा प्रकल्प, तसेच मुळशी ते वाघवाडी पूल बांधण्याची मागणीही करण्यात आली आहे.
झाल्यास रास्ता रोकोचा इशारा
मुळशी धरणग्रस्तांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी टाटा कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि समितीच्या प्रतिनिधींची तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता बालेवाडी स्टेडियम परिसरातील ऑर्किड हॉटेल येथे ही बैठक आयोजित करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही समितीने दिला आहे.
या संदर्भातील मुळशी धरणग्रस्त कृती समिती व माजी सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती श्री. अमितदादा कंधारे यांच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे





