Homeसाहित्य/शैक्षणिकपुणे/उपनगरमुळशी तालुक्यातील पौड येथे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना साखर...

मुळशी तालुक्यातील पौड येथे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना साखर वाटप.

पौड (प्रतिनिधी)
मुळशी: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पौड येथे श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकरी बांधवांसाठी आयोजित साखर वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सभासद शेतकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांना दीपावलीच्या आगाऊ शुभेच्छा दिल्या.

सहकाराच्या माध्यमातून बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकरी बांधवांच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो, अशी सदिच्छाही व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमास आमदार शंकरभाऊ मांडेकर, जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, कारखान्याचे संचालक यशवंत गायकवाड, धैर्यशील ढमाले, राजेंद्र कुदळे, पंचायत समिती सदस्य प्रवीण धनवे, पंचायत समिती सदस्या काजल मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबाजी शेळके यांच्यासह अनेक मान्यवर आणि सभासद शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments