Homeसाहित्य/शैक्षणिकस्व. सुभाषभाऊ अमराळे यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त ‘समाजभूषण पुरस्कार सोहळा २०२६’चे आयोजन.

स्व. सुभाषभाऊ अमराळे यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त ‘समाजभूषण पुरस्कार सोहळा २०२६’चे आयोजन.

पौड प्रतिनिधी |
मुळशी:- स्वर्गीय सुभाषभाऊ अमराळे यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त ‘समाजभूषण पुरस्कार सोहळा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात पद्मश्री राहिबाई पोपेरे यांना ‘बीजमाता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता घोटवडे फाटा येथील सुंदरबन कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेतील विजेत्यांसह विशेष सन्मानित करण्यात येणार आहे. स्व. सुभाषभाऊ अमराळे यांच्या जयंतीनिमित्त शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांचे वाटपही या कार्यक्रमात होणार आहे.

कार्यक्रमाला मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर हे शुभहस्ते उपस्थित राहणार असून, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विराजवल जगदाळे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

या सोहळ्यात मुळशी भूषण पुरस्कारार्थी म्हणून कु. सुमित कैलास ढमाले, कु. शौर्य दिलीप भराडे, कु. हिंदवी भूषण वाघवे, कु. कार्तिक सुनिल मरगळे, पं. समर्थ धनंजय गावडे आणि कु. ऋषी शिवाजी ढमाले यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे कार्यक्रमात नमूद आहे.

कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, कृषी, सांप्रदायिक, कला, क्रीडा व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन सुभाषभाऊ अमराळे सोशल फाउंडेशन, समस्त ग्रामस्थ अंबडवेट (पौड) आणि जनकल्याण युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व सचिन भाऊ अमराळे यांच्या वतीने हा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments