
वाकड प्रतिनिधी :
पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील प्रिस्टीन प्रो लाइफ परिसरात रविवारी (२५ ऑक्टोबर) पहाटे आगीची घटना घडली. या आगीत परिसरातील सहा ते सात दुकानांना फटका बसल्याचे प्राथमिक माहिती समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी रहाटणी उपअग्निशमन केंद्राला आगीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी रवाना झाले. काही दुकाने बंद असल्याने आग विझवण्यासाठी दुकानांचे शटर तोडावे लागले. अग्निशमन दलाने होज पाइप आणि अन्य उपकरणांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे काम केले.
या आगीत सहा ते सात दुकानांचे नुकसान झाल्याचे माहिती समोर आले आहे. आग पुन्हा भडकू नये, यासाठी अग्निशमन दलाने संबंधित दुकानांची सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी केली. या बचावकार्यादरम्यान थेरगाव उपअग्निशमन केंद्र आणि मुख्य अग्निशमन केंद्राच्या पथकांनीही मदत केली आहे.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे तसेच कोणी जखमी झाल्याची नोंद नसल्याचे नागरिक म्हटले आहे. मात्र, आगीमुळे दुकानांचे किती आर्थिक नुकसान झाले, याचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.
प्रिस्टीन प्रो लाइफ परिसरात आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समोर स्पष्ट माहिती आलेले नाही.





