Homeसाहित्य/शैक्षणिकपिंपरी चिंचवडनवीन क्षेत्रीय कार्यालय सुरू; मात्र मनुष्यबळ, वाहनांची कमतरता! नगरसेवक राहुल कलाटे यांचे...

नवीन क्षेत्रीय कार्यालय सुरू; मात्र मनुष्यबळ, वाहनांची कमतरता! नगरसेवक राहुल कलाटे यांचे महापालिका आयुक्तांकडे निवेदन .

वाकड (प्रतिनिधी)
२९ ऑक्टोबर २०२६

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रायगड (ज) क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कचरा संकलन आणि स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अपुरी वाहने, मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपा नगरसेवक राहुल तानाजी कलाटे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेनंतर कचरा संकलन व्यवस्था अद्याप पूर्णपणे सुरळीत झालेली नसल्याचे कलाटे यांनी नमूद केले. कचरा खाली करण्यासाठी वाहनांना चार ते पाच तास लागत असल्याने संकलनाच्या फेऱ्या कमी होत आहेत. परिणामी, वाकड, ताथवडे, पुनावळे, पिंपळे निलख, रावेत, किवळे आणि मामुर्डी परिसरातील काही सोसायट्यांमध्ये कचरा साचणे व दुर्गंधीच्या समस्या निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन घंटागाड्या, स्वच्छता कर्मचारी आणि आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करावी, कचरा संकलनाच्या फेऱ्या वाढवाव्यात तसेच निष्काळजी ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याशिवाय, गटारांच्या स्वच्छतेसाठी जेटिंग मशीन उपलब्ध करून देण्यासह सांडपाणी प्रक्रियेसाठी पुरेशा क्षमतेचे एसटीपी प्रकल्प उभारावेत आणि पर्यावरणाचे नुकसान रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेवक राहुल कलाटे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments