Homeराजकीयमुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्यात घुसखोरी संचेती चौकातील प्रकार बेदरकार वाहन चालविल्याने मद्यपी...

मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्यात घुसखोरी संचेती चौकातील प्रकार बेदरकार वाहन चालविल्याने मद्यपी दुचाकीस्वारा विरुद्ध गुन्हा दाखल..

पुणे:-  दिनांक (15) संचेती चौकात केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शासकीय ताफ्यात मद्यप्राशन केलेल्या दुचाकी स्वाराने घुसण्याचा प्रयत्न केला.. ताफ्यातील वाहनांना अडथळा निर्माण होईल, असा पद्धतीने दुचाकी चालवण्या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शुभम विजय वनीत (32) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..

याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार ईश्वर लक्ष्मण भिकुले यांनी फिर्याद दिली आहे भिकूले पोलीस मुख्यालय नियुक्तीस असून, मोहोळ यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत आहे..
13 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारात मोहोळ यांचा ताफा संचेती चौकातून पुढे जात होता.
त्यावेळी वनीत याने बेदरकारपणे दुचाकी चालवत ताफ्यातील वाहनांच्या जवळून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ताब्याच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला वनीत कॅम्प परिसरातील कपड्याच्या दुकानात कामाला असून काम संपल्यानंतर मित्रांसोबत पार्टी करून तो निघाला होता या प्रकरणा नंतर पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. याचा तपास फौजदार विकास साठे पुढील करत आहे..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments