Homeराजकीयमुळशी तालुक्यातील माले गावाचा विकासकामांवर प्रश्न उपस्थित करून बदनामी करण्याचा प्रयत्न; सरपंच...

मुळशी तालुक्यातील माले गावाचा विकासकामांवर प्रश्न उपस्थित करून बदनामी करण्याचा प्रयत्न; सरपंच सुहास शेंडे यांचा विरोधकांवर निशाणा.

मुळशी प्रतिनिधी:
माले गावात झालेल्या विकासकामांचे स्वागत करण्याऐवजी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून गावाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माले ग्रामपंचायतीचे सरपंच सुहास शेंडे यांनी केला आहे. समृद्ध ग्रामविकास स्पर्धेत ग्रामपंचायतीला तालुकास्तरावर पारितोषिक मिळाल्यानंतर काही जणांकडून तक्रारी केल्या जात असल्याने या तक्रारींमागील हेतूवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

माले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विविध विकासकामे करण्यात आली असून, या कामांच्या जोरावर ग्रामपंचायतीने स्पर्धेत यश संपादन केले. मात्र, या यशाचे श्रेय सरपंचांना मिळू नये, या राजकीय हेतूने काही जणांकडून तक्रारी केल्या जात असल्याची टीका शेंडे यांनी केली. गावाच्या विकासाला प्रोत्साहन देण्याऐवजी विकासकामांवर संशय व्यक्त करणे ही दुर्दैवी बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘राजकीय वादात गावाची प्रतिमा खराब करू नका!’विकासकामांबाबत आक्षेप असतील, तर ते योग्य यंत्रणेसमोर मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, आरोप करताना गावाच्या प्रतिष्ठेचाही विचार होणे आवश्यक आहे. खोट्या आरोपांमुळे केवळ सरपंचांची नव्हे, तर संपूर्ण गावाची बदनामी होत असल्याचे भान विरोधकांनी ठेवावे, असा टोला सरपंच सुहास शेंडे यांनी लगावला.

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या वतीने या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यात आले असून, ग्रामपंचायतीमध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नसल्याची भूमिका मांडण्यात आली आहे. ग्रामसभा शासनाने निर्धारित केलेल्या नियमांनुसारच पार पडल्या असल्याचेही ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले आहे.

चौकशीतून वस्तुस्थिती स्पष्ट होणार संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असून, चौकशी यंत्रणेला आवश्यक ते सर्व सहकार्य केले जात असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

गावाच्या विकासकामांवरून सुरू झालेला हा वाद आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या दिशेने जात असताना, चौकशीच्या निष्कर्षांकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments