Homeसाहित्य/शैक्षणिकपुणे/उपनगरभातशेतीत खोदकाम सुरू होताच सभापती मंदाताई बाबाजी शेळके मैदानात; ४०० केव्ही विद्युत...

भातशेतीत खोदकाम सुरू होताच सभापती मंदाताई बाबाजी शेळके मैदानात; ४०० केव्ही विद्युत वाहिनीचे काम रोखले!

मुळशी प्रतिनिधी:-
कातरखडक, खांबोली. पिंपळोली आणि रिहे परिसरातील भातशेतीत ४०० केव्ही विद्यूत वाहिनीसाठी खोदकाम सुरू झाल्याने शेतकन्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकन्यांच्या तक्रारींची दखल घेत मळशी पंचायत सामेतीच्या सभापती मंदातार्ड बाबाजी शेळके यांनी घटनास्थळी भेट देत सुरू असलेले काम बंद पाडले
यासंदर्भात राष्टवादी काँग्रेसचे मुळशी तालुका उपाध्यक्ष बाबाजी शेळके यांनी आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या निदर्शनास हा प्रश्न आणून दिला आहे.

“शेतकऱ्यांच्या एक इंचही जमिनीला हात लावू देणार नाही विद्युत वाहिनीसाठी पर्यायी मार्गाचा विचार करा; मात्र शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान सहन केले जाणार नाही, ” असा कडक इशारा मंदाताई शेळके यांनी संबंधितांना दिला.

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या तक्रारींचे निराकरण केल्याशिवाय काम सूरू करू नये, अशी मागणी परिसरातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments