Homeसाहित्य/शैक्षणिकपुणे/उपनगरमुळशी तालुक्यातील मांदेडे-दत्तवाडीतील महिलांच्या आंदोलनाची दखल; १५ दिवसांत डीपी बसवून पाणीप्रश्न सोडविण्याचे...

मुळशी तालुक्यातील मांदेडे-दत्तवाडीतील महिलांच्या आंदोलनाची दखल; १५ दिवसांत डीपी बसवून पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन!

मुळशी:- मुळशी तालुक्यातील मांदेडे-दत्तवाडी येथील कमी वीजदाब आणि पाणीटंचाईच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या महिलांच्या आंदोलनाची लोकप्रतिनिधींनी दखल घेतली आहे. येत्या ८ ते १५ दिवसांत नवीन वीज वितरण रोहित्र (डीपी) बसविण्यात येईल, तसेच नवीन बोअरवेल घेऊन पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले आहे. या आश्वासनानंतर महिलांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले असून, दिलेल्या मुदतीत प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मांदेडे-दत्तवाडी परिसरातील महिलांना गेल्या अनेक दिवसांपासून कमी वीजदाबामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीजपुरवठ्यातील समस्येचा परिणाम पाणीपुरवठ्यावरही होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक महिलांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती.

या पार्श्वभूमीवर आमदार शंकर मांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य मिलिंद वाळंज, पंचायत समिती सदस्य प्रवीण धनवे आणि काजलताई मोरे यांनी मांदेडे-दत्तवाडी परिसरातील नागरिकांची संवाद साधला. यावेळी समस्या जाणून घेत संबंधित प्रश्न सोडविण्याबाबत आश्वासन देण्यात आले.

नवीन डीपी आणि बोअरवेलकडे महिलांचे लक्ष

परिसरातील कमी वीजदाबाची समस्या दूर करण्यासाठी नवीन डीपी बसविण्यात येणार असून, पाणीटंचाईवर उपाय म्हणून नवीन बोअरवेल घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ही कामे येत्या ८ ते १५ दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर महिलांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

मुदतीत प्रश्न न सुटल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनाचे स्वागत करतानाच महिलांनी प्रश्नांच्या प्रत्यक्ष सोडवणुकीवर भर दिला आहे. निर्धारित १५ दिवसांच्या कालावधीत नवीन डीपी बसविणे आणि पाणीप्रश्न सोडविण्याबाबत ठोस कार्यवाही झाली नाही, तर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महिलांनी दिला आहे.

मांदेडे-दत्तवाडीतील नागरिकांचे लक्ष नवीन डीपी बसविण्याच्या कामाकडे आणि पाणीटंचाई दूर करण्यासाठी होणाऱ्या कार्यवाहीकडे लागले आहे. लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनांची वेळेत पूर्तता झाल्यास परिसरातील महिलांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments