
पुणे : ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्डच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी श्री. सनी निम्हण यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची तसेच भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीच्या कार्याची दखल घेत ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात भ्रष्टाचारविरोधी जनजागृती वाढविणे, नागरिकांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करणे तसेच पारदर्शक व जबाबदार प्रशासनासाठी प्रयत्न करणे, या उद्देशाने सनी निम्हण यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, नवीन जबाबदारीसाठी सनी निम्हण यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.





