
पौड:- पुणे पश्चिम रिंग रोडच्या भूसंपादनाबाबत राज्य शासनाने आणि प्रशासनाने नवीन राज्यपत्र प्रसिद्ध केले असून,कासार आंबोली परिसरातील रिंग रोडच्या मार्गात काही बदल करण्यात आले आहेत.
या प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे बिटरला अभय कासार आंबोली येथील नव्यांश सोसायटीच्या (फेज2) प्रकल्पातून जाणारा रोड समोर मार्ग प्रशासनाने बदलला आहे. हा प्रकल्प वाचवण्यासाठी आता हा रस्ता प्रकल्पाच्या मागून म्हणजे स्थिर नागरिकांचे शेतातून नेण्यासाठी घेण्यात आला आहे चौक पुणे-कोलाड महामार्गाला क्रॉस होणाऱ्या कासारआंबोली येथे रिंगरोड साठी ‘इन-आऊट’ (Interchanges) देण्यात आले आहे. भूसंपादन आदेश या बदललेल्या मार्गामुळे बधित होणाऱ्या कासारआंबोली, भरे, आणि अंबडवेट या गावांशी प्रशासनाने भूपसंपदानाचे अधिकृत आदेश काढले आहेत.
हरकतीनसाठी मुदत: या अधिसूचनेवर किंवा भूसंपादनावर कोणताही आक्षेप असल्यास नागरिकांनी 21 दिवसाच्या आत पुणे उपविभागीय अधिकारी (मावळ-मुळशी) यांच्याकडे सविस्तर कारणासह आपली लेखी हरकत नोंदवावी..





