
मावळ:- शिळींब गावामध्ये गणेशोत्सव निमित्त साहिल शिंदे यांच्या घरी श्री गणपती बाप्पांचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले आहे. पारंपारिक पद्धतीने पूजा व प्राणप्रतिष्ठा करून गणरायाचे स्वागत करण्यात आले.
यावेळी घरामध्ये भजनाचा कार्यक्रम व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या भजनाच्या कार्यक्रमामुळे कुटुंबामध्ये व परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले.
तसेच यावेळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने गौरी पूजन आव्हानाचा धार्मिक कार्यक्रम साहिल शिंदे यांच्या घरी पार पडला यावेळी गौरी अहवानाच्या पारंपारिक विधीमध्ये महिला व कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतला.
गणपती बाप्पांच्या आगमनाने शिंदे कुटुंबियांच्या घरी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील दिवसात विविध धार्मिक व
सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे..





