
पुणे:- गणेश उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भरत शेठ गोगावले यांनी साने गुरुजीं तरुण मंडळाला भेट देऊन मंडळांनी साकारलेल्या “श्री रामेश्वर मंदिर” याचे भव्य देखाव्याचे पाहणी करून मंडळाचे कौतुक केली.
गणेशोत्सवानिमित्त सर्व मंडळांना भेट देऊन आपुलकी जपणाऱ्या भरत शेठ गोगावले यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला व त्यांनी वेळात वेळ काढून मंडळाला उपस्थित झाल्यामुळे मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, सम्राट थोरात, मंडळाचे कार्याध्यक्ष नगरसेवक अमर आवळे व साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे व मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते





