Homeमनोरंजनश्री कसबा गणपती मंदिरात शिवसेना सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांसमवेत आरतीचा मान.

श्री कसबा गणपती मंदिरात शिवसेना सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांसमवेत आरतीचा मान.

पुणे : पुण्यातील मानाचा गणपती असलेल्या श्री कसबा गणपती मंदिरात शिवसेना सोशल मीडिया पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत मनोभावे आरती करण्याचा मान मिळाला. यावेळी श्री गणरायाचे दर्शन घेऊन भक्तिभावाने आरती करण्यात आली.

यावेळी महादेव सलवडे पाश्चिम महाराष्ट्र प्रमुख सोशल मीडिया राज्य कार्यकारिणी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख समीर नाईक, जिल्हा समन्वयक प्रणव पैठणकर, उपशहर प्रमुख नितीन भंडारे सर, सचिन नार्डक तसेच शिवसेना युवासेना सोशल मीडिया अध्यक्ष, भोर विधानसभा उमेश बुक्कणकर यांच्यासह शिवसेना सोशल मीडिया परिवारातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व पदाधिकाऱ्यांसोबत मनोभावे आरती करून श्री गणरायाचे आशीर्वाद घेतले. शिवसेना सोशल मीडिया परिवारातील सर्व पदाधिकाऱ्यांसोबतचा हा भक्तिमय क्षण मनाला विशेष आनंद आणि समाधान देणारा ठरला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments