Homeताज्या बातम्यापुण्यातील नवले पुलावर तीन ट्रकची भीषण धडक!

पुण्यातील नवले पुलावर तीन ट्रकची भीषण धडक!

जोरदार अपघाताने परिसर हादरला; वाहतुकीचा मोठा खोळंबा!!

पुणे : नवले पुलावर रात्री तीन ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. धडकेचा आवाज परिसरात घुमला आणि काही क्षणांतच घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

तीनही ट्रक एकमेकांवर आदळल्याने पुलावर वाहनांची मोठी गर्दी झाली. अपघातामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या दुर्घटनेत जखमी किंवा जीवितहानी झाली आहे का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. दरम्यान, तीन ट्रकची धडक नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचा तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments