Homeताज्या बातम्यामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी.

पुणे शहर:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. तसेच आरती केली. यावेळी विविध गणेश मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री श्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी मानाचा कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, साने गुरुजी तरुण मंडळ, तसेच श्री साई मित्र मंडळ ट्रस्ट येथील श्री गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली तसेच महापौर मंजुषा नागपुरे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार नितीन नवीन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, योगेश टिळेकर, हेमंत रासने कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे अध्यक्ष सुनील रासने, साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह विविध गणेश मंडळाचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.

श्री साई मित्र मंडळ ट्रस्टच्या गणपती परिसरात मुख्यमंत्री श्री फडणवीस यांचे पारंपारिक ढोल-ताशा गजरात पथकाने स्वागत केले यावेळी त्यांनी ढोल वाजवणाऱ्या युवाकडून टिपून काठी घेत स्वतः ढोल वाजविण्याचा आनंद घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments