Homeताज्या बातम्यामुळशी तालुक्यातील धरणग्रस्तांच्या मागण्या संदर्भात प्रशासनाची बैठक टाटा कंपनीकडून वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव...

मुळशी तालुक्यातील धरणग्रस्तांच्या मागण्या संदर्भात प्रशासनाची बैठक टाटा कंपनीकडून वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन

 

मुळशी पौड ( प्रतिनिधी) मुळशी धरणग्रस्तांच्या मागण्यांसाठी प्रशासनाची बैठक टाटा कंपनीचे अधिकारी यांच्यासह मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चोबे यांच्या अध्यक्षतेखाली मुळशी तहसील कार्यालयात सोमवारी (दि:-०७/०९/२०२६) रोजी पार पडली..

 

या बैठकीत माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांनी मांडलेल्या मागण्यांच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली..
टाटा पॉवर कंपनीच्या प्रतिनिधींनी अनेक मागण्यांबाबत कंपनीचे वरिष्ठ स्तरावरच्या अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले…

मुख्य मागण्या:-मुळशी धरणातून पिण्याचे व शेतीसाठी दोन टीएमसी पाणी मिळावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली.. याबाबत जलसंपदा विभागाकडून आवश्यक प्रस्ताव मागवून पुढील कार्यवाही करावी अशी माहिती देण्यात आली.
धरणग्रस्तांच्या त्यांच्या हक्काचे गावठाण मिळावे यासाठी टाटा कंपनीने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली..
याबाबत एकूण ९ गावांना गावठाणा बाबत प्रक्रिया पूर्ण झाल्याचे टाटा कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले..
माले येथील 75 लाख रुपयांचा निधी माले येतील सेनापती बापट विद्यालयातील अकरावी व बारावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पाच एकर जागा मिळावी.. धरणग्रस्त गावांच्या ग्रामपंचायतींना सीएसआर निधी उपलब्ध करून देण्याची चर्चा महत्वपूर्ण झाली..
मुळशी धरणग्रस्तांच्या 105 वर्षापासून विस्थापित व भेडसावणाऱ्या असलेल्या समस्या सोडवण्याची मागणी टाटा कंपनीच्या प्रतिनिधीला करण्यात आली..
मुळशी तालुक्यातील माण, हिंजवडी परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टाटा कंपनीकडून पाणी उपलब्ध करून देणे पावसाळ्यात बंद असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती व कातकरी समाजातील घरकुल व इतर सुविधा तसेच ग्रामपंचायतच्या हद्दीतील जमिनी यासंदर्भात मागण्यांवर चर्चा करण्यात आली..
धरणग्रस्त गावातील रस्ते, समाज मंदिरे, पाण्याच्या योजना स्मशानभूमी आदी पायाभूत सुविधांसाठी कंपनीकडून सहकार्य मिळावे अशी मागणी केली.
माले येथील आरोग्य केंद्रात टाटा कंपनीच्या सहकार्याने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व मुळशी माले येथील वीज वितरणासाठी व्यवस्था करावी व मुळशी येथे मुलांसाठी क्रीडांगण व बाग उपलब्ध करून द्यावी तसेच स्थानिक तरुणांना टाटा कंपनीमध्ये रोजगाराचे संधी उपलब्ध करून द्यावी आणि मुळशी ते वाघवाडी पूल व हिंजवडी येथील आयटी पार्क मधून पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याच्या विकासासाठी सीएसआर निधीतून 20 टक्के निधी मिळावा या यासंदर्भात महत्त्वपूर्वक मागण्यांसह बैठकीस पार पडली..

इतर मागण्यासंदर्भात कंपनीचे वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील असे कंपनीचे प्रतिनिधींनी स्पष्ट मत केले आहे.. यासंदर्भात सर्व विषयांवर चर्चा व प्रस्ताव सादर करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आले या बैठकीतील सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने कार्यवाही पुढीलपैकी लवकरात लवकर करावी व पुढील बैठक आयोजित करावी असे तहसीलदार विजयकुमार चौबे यांनी सांगितले

या महत्वपूर्ण बैठकीत जिल्हा परिषद सदस्य शिवाजी राजाराम बुचडे, अमित कंधारे, टाटा पॉवर चे अजय कोणणूर, श्रीकांत कंदी आकाश धनवट, वारकचे सरपंच संतोष भिलारे, वांद्रे चे सरपंच रमेश पडवळ, संजय हुंडारे, सचिन कोंढाळकर, विठ्ठल पडवळ तसेच विविध ग्रामपंचायतचे सरपंच तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments