(मुळशी) पौड प्रतिनिधी पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाला मोठी गती मिळाली असून विमानतळासाठी आवश्यक असलेल्या एकूण जमिनींपैकी सुमारे 75 टक्के म्हणजेच 850 हेक्टर जमीन जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आली आहे. या जमिनीच्या मोबदल्या पोटी आतापर्यंत तीन हजार सहाशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे सप्टेंबर अखेरपर्यंत सुमारे 80 टक्के म्हणजेच जवळपास 950 हेक्टर जमीन ताब्यात येण्याची शक्यता आहे पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभार वळण, उदाचीवाडी, एखतपूर, पारगाव, मुंजवडी आणि खानवडी या सात गावांमध्ये 1 हजार 216 हेक्टर जमिनीचे विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येत आहे आत्तापर्यंत सुमारे 96% शेतकऱ्यांनी भूसंपादनास सहमती दिली आहे त्यापैकी 850 हेक्टर जमिनीची प्रत्यक्ष ताबा प्रशासनाकडे आला असून संबंधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहे..
विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सुमारे 40 हेक्टर जमिनी बाबत अद्याप शेतकऱ्यांची सहमती मिळाली नाही निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या जमिनीचा ताबा मिळाला नाही तर त्यानंतर संबंधित जमिनी तातडीने सक्तीने संपादित करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे…
या संदर्भात पुरंदर विमानतळासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत 80% जमीन ताब्यात येऊ शकते त्यामुळे आवश्यक जमीन उपलब्ध असल्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे मार्ग मोकळा झाला आहे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास येत्या डिसेंबरपासून विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे *जिल्हाधिकारी जितेंद्र ड्डडी यांनी स्पष्ट केले आहे…