माण:- मुळशी तालुक्यातील हिंजवडी, माण, मारुंजी, भुगाव, नेरे, जांबे, व पिरंगुट परिसरातील वाढत्या वाहतुकीच्या या समस्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत स्थानिक नागरिक, आयटी, कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ व प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या समस्या मांडत जनहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विषयाकडे पालकमंत्री महोदयांनी आणि प्रशासनाने लक्ष वेदले आहे.
या बैठकीत प्रमुख निर्णय व मागण्या पुढील प्रमाणे:- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुविधा आयटी कर्मचाऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळण्यासाठी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी आग्रही मागणी या बैठकीत करण्यात आली., 100 नवीन ट्राफिक वॉर्डन वाहतुकीचे सुरळीत नियोजन करण्यासाठी हिंजवडी माण, महाळुंगे, भुगाव, व पिरंगुट या परिसरात तात्काळ 100 ट्राफिक वॉर्डन तैनात केले जाणार आहेत.. दर शुक्रवारी आढावा: वाहतूक व इतर समस्या सोडवण्यासाठी विशेष समन्वय समिती स्थापन करून दर आठवड्याला कामाचा सखोल पाठपुरावा केला जाणार आहे., उड्डाणपूल व रस्ते विकास एमआयडीसीच्या (MIDC) प्रस्तावित उड्डाणपूलांची कामे वेगाने सुरू करणे आणि परिसरातील खड्डे मुक्त रस्त्याची युद्ध पातळीवर दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले., 2 TMC पाणीपुरवठा: मुळशी तालुक्यातील टाटा धरणाकडून 2 TMC पाणी मिळण्याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थित लवकर स्वतंत्र बैठक घेतली जाणार आहे., एसटीपी (STP) प्रकल्पाची निविदा प्रक्रिया: सुरू करण्यात येत आहे सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी (STP) खालील 3 मुख्य ठिकाणी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे..
या बैठकीत विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, PMRDA, PCMC, PWD, MIDC व महा मेट्रोच्या वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते..स्थानिक नागरिक आयटी कर्मचारी व ग्रामस्थ यांना भेडसावणाऱ्या समस्यांपासून कायमस्वरूपी दिलासा मिळण्याची शक्यता या बैठकीतून स्पष्ट होत आहे…