
पौड:- मुळशी तालुक्यातील बावधन, खुर्द, बुद्रुक, भुगाव, सुस, नांदे, माण, हिंजवडी, मारुंजी, जांबे, नेरे, कातडी, मारणेवाडी, आंबेगाव, उरवडे, कासार आंबोली, भरे, अंबरवेड, घोटावडे, रिहे, केमसेवाडी, पिंपळोली या गावांमध्ये PMRDA चा रिंग रोडचा प्रकल्प प्रस्तावित असून या रोड मध्ये अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन झाले आहेत तरी काही शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित राहावे लागले आहेत..
रिंगरोड साठी भूसंपादक जमिनी शेतकऱ्यांच्या गेल्या असल्या कारणामुळे शेतकऱ्यांचे अनेक उत्पन्न व भाडे मिळण्याचे मार्ग बंद झाले आहे शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन साठी अडकल्याने जो काही मोबदला आहे तोही शेतकऱ्यांना मिळाला नाही व शेतकऱ्यांच्या जमिनी रिंग रोडच्या नावाखाली अडकून राहिले आहेत.
रस्त्याच्या मार्गात येणारी शेतकऱ्यांची राहती घरे, जनावरांचे गोठे जमीनदोस्त केले जातात, ज्यामुळे अनेक कुटुंबे बेघर आणि भूमिहीन होतात.रोड शेतातून गेल्यास जमिनीचे दोन तुकडे पडतात. यामुळे उर्वरित भागात शेती करणे मुश्किल होऊ लागले, तिथे पाण्याचा पुरवठा करणे किंवा ट्रॅक्टर नेणे अत्यंत कठीण होऊन बसले आहे.
जमिनीसोबतच शेतातील फळझाडे, विहिरी, शेततळे आणि पाईपलाईन यांचा योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहेत.
अनेक गावांमध्ये प्रशासनाकडून नकाशा न दाखवता किंवा पूर्वकल्पना न देता मोजणीचे प्रयत्न केले जातात, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष असतो.
रिंग रोडचा प्रकल्प गेले दोन वर्ष चालू असले आहे तरी शेतकऱ्यांचा मोबदला का रकडला आहे
आपल्या हक्काच्या जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना शेती सोडून रस्यावर उतरावे लागते आहे…





