
एमआयटी कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या वर्दळीमुळे परिसरातील निर्माण होणाऱ्या विविध समस्या वाहतूक कोंडी पार्किंगच्या प्रश्नावर ठोस उपयोजना करण्यासाठी गिरिजा सोसायटीच्या सभागृहात परिसरातील नागरिकांना बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गवळी साहेब आणि एरंडवणे पोलीस चौकीचे पीएसआय डोंबे साहेब उपस्थित होते….
या बैठकीमध्ये नागरिकांना भेडसवणारे प्रश्नांवर लवकरात लवकर प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्याचे आश्वासन वाहतूक पोलिसांकडून देण्यात आले तसेच या उपयोजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ते पूर्ण सहकार्य करण्याची नागरिकांनी व्यक्त केले नागरिकांच्या समस्या ऐकूण त्यावर संबंधित यंत्रणे सोबत साधून प्रत्यक्ष उपाय करण्याचा प्रयत्न असून या बैठकीनंतर नागरिकांच्या समस्यांवर उपयोजना होईल व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे..
या बैठकीत गिरीजा सोसायटीचे सिंगा वन, सावली, पेरिन शेरी, शिवपार्वती आणि प्रतीक सोसायटी मधील नागरिकांनी आपल्या परिसरातील अडचणी व सूचना मांडल्या यांच्यासह आरे काका, ओम प्रकाश कासट, बर्वे साहेब, निखिल ढोले, सावरकर काका, श्री बोंद्रे, सौ. अनुराधा राजहंस ताई, मिलिंद परांजपे, संतोष पानसे यांच्यासह नागरिकांनी मांडलेल्या सूचनांवर गवळी साहेबांनी विविध उपयोजना सुचवल्या…





