Homeराजकीयमाजी राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन.

माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन.

माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन.वडगाव मावळ:- राज्याचे माजी राज्यमंत्री मदन बापना यांचे सोमवारी (दिनांक 14) वयाच्या 85 व्या वर्षी हृदय विकारच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या निधनाने मावळ तालुक्यात शोककळा पसरले असून मंगळवार (दिनांक 15) वडगाव मावळ येथील वैकुंठ स्मशान भूमी येथे त्यांचा पार्थिववावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, तीन भाऊ, दोन बहिण, सुना नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अशोक बाफना उद्योगपती राम बाफना त्यांचे भाऊ तर लक्षमी को-ऑपरेटिव्ह बँक माजी संचालक गणेश बाफना त्यांचे चिरंजीव व उद्योगपती राजेश बाफना त्यांचे पुतणे होते..

मंगळवारी सकाळी 10 वाजता वडगाव मावळ येथे संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या आवारात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे सायंकाळी 4 वाजता त्यांचे राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघेल वडगाव मावळ येथील वैकुंठ स्मशान भूमी मध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे..

मदन बापना यांनी वडगाव ग्रामपंचायत चे सदस्य ते महाराष्ट्र राज्याचे मंत्रिपदापर्यंत यशस्वी राजकीय वाटचाल केले असून या काळात त्यांनी तात्कालीन मुख्यमंत्री शरद पवार सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळामध्ये महसूल, नगर विकास,अर्थ,विधी अशा विविध खात्यांची मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली तसेच पुणे जिल्हा व ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्री पद ही त्यांनी भूषवले आहे त्यांच्या निधनामुळे मावळ तालुक्यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रामध्ये पोकळी निर्माण झाले असून संपूर्ण मावळ मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments