Homeमनोरंजनलोणावळ्यात श्री खंडोबाच्या लग्नाचा भव्य देखावा: मानाचा ६ गणपती श्री राणा प्रताप...

लोणावळ्यात श्री खंडोबाच्या लग्नाचा भव्य देखावा: मानाचा ६ गणपती श्री राणा प्रताप नेताजी मित्र मंडळाचा अनोखा धार्मिक-सांस्कृतिक उपक्रम.

मावळ : गणेशोत्सवानिमित्त लोणावळा येथील मानाचा ६ गणपती म्हणून ओळख असलेल्या श्री राणा प्रताप नेताजी मित्र मंडळाने यंदा भाविकांसाठी श्री खंडोबाच्या लग्नाचा आकर्षक व मनोहारी देखावा सादर केला आहे. पारंपरिक धार्मिक संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरेचा सुरेख संगम या देखाव्यातून अनुभवायला मिळत आहे.

श्री खंडोबा महाराज आणि देवी म्हाळसा यांच्या विवाह सोहळ्याचे विविध प्रसंग देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात आले असून, देखाव्याची कलात्मक मांडणी, सजावट आणि प्रकाशयोजना भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक परंपरा आणि संस्कृतीची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा मंडळाचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.

गणरायाच्या दर्शनासोबतच श्री खंडोबाच्या विवाह सोहळ्याचा हा देखावा पाहण्यासाठी नागरिक व भाविक मोठ्या संख्येने भेट देत असून, मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून देखाव्याचे नियोजन उत्कृष्ट प्रकारे झाला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments