
पुणे : नारायण पेठ येथील भोलेनाथ मित्र मंडळाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमितजी राजसाहेब ठाकरे यांनी गणेशोत्सवानिमित्त सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांनी मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेतले तसेच मंडळाने साकारलेल्या नेपाळ येथील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराच्या देखाव्याची पाहणी करून कौतुक केले.
यावेळी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक परंपरा जपण्याचे मंडळाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. भेटीदरम्यान मंडळाच्या वतीने अमितजी राजसाहेब ठाकरे यांचा सत्कारही करण्यात आला.





