
पौड:- हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील रस्ते, विकास, भूसंपादन, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, धनकचरा, व्यवस्थापन यांसारख्या विविध महत्त्वाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र ङुङी यांच्या मार्गदर्शनाखाली तिसरी निर्णायक आढावा बैठक या ठिकाणी पार पडली.
भविष्यकाळात तातडीने कारवाई करण्याचे नियोजन पुढील प्रमाणे:” नदी नाले व ओढ्यांवरील अतिक्रमणाचे तसेच Right Of Way वरील अवैध बांधकामे तातडीने हटवणे. SMART CCTV व SIGNAL यंत्रांना अहवाल सादर करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करणे. भूमकर चौक ते पुनावळे सेवा रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करणे आणि अधिकृत पाणी सोडवण्याविरुद्ध FIR नोंदवणे. अवजड वाहनांसाठी नवीन नियमावली तयार करून गृहप्रकल्प व नवीन बांधकाम परवानग्यांमध्ये ती बंधनकारक करणे. मारुंजी STP कनेक्शन PCMC च्या STP मध्ये जोडण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे..
प्रमुख कालबद्ध निर्णय पुढील प्रमाणे:” भुमकर चौक पुनावळे सेवा रस्ता डांबरीकरण अवजड वाहन नियमावली मारुंजी STP जोडणी व 100 ट्राफिक वॉर्डनची नियुक्ती 30 सप्टेंबर 2026 रोजी पर्यंत खड्डे, साईड पट्टे व रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करण्याचे आश्वासन.
1 डिसेंबर 2026 रोजी लक्ष्मी चौक उड्डाणपुल व DP रस्त्यांचे प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे..
पाणी व कचरा (2 TMC) पाणीपुरवठा नियोजन करणे व एक महिन्यात धनकचरा व्यवस्थापन याचे सर्वेक्षण करणे.
या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी श्री जितेंद्र ङुङी साहेब आणि भोर,राजगड, मुळशीचे आमदार शंकर भाऊ मांडेकर व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते..
“आमदार मांडेकर म्हणाले”” आयटी पार्क आणि परिसरातील स्थानिक नागरिकांना दैनंदिन प्रवास व जीवनमान सुकर व्हावे यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून सदर समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी माझी असून पाठपुरावा सुरू राहील..





