Homeसाहित्य/शैक्षणिकमुळशी पेन्शनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

मुळशी पेन्शनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

पौड:- मुळशी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे सामाजिक योगदान अत्यंत मोलाचे असून आज पौड येथे सेनापती बापट सभागृह मध्ये आयोजित मुळशी तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न या सभेमध्ये जेष्ठ नागरिकांना व पेन्शन बांधवांचे विविध प्रश्नांवर तसेच ज्येष्ठ नागरिकांना भेडसवणाऱ्या अडचणी व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सभेतील महत्त्वपूर्ण “मागण्या” निवृत्ती वेतनाचे प्रलंबित प्रस्ताव वेळेवर मंजूर करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कल्याणकारी योजनांना लाभ विना अडथळा मिळवून देणे, पेन्शन धारकांच्या प्रशासकीय अडचणी व तक्रारींचे वेळत निवारण करणे व इतर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या सभेला भोर राजगड मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर, माजी आमदार शरदभाऊ ढमाले, पंचायत समिती सभापती मंदाताई शेळके, उपसभापती दगडू काका करंजगावणे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, राज्य पेन्शन असोसिएशनचे अध्यक्ष एन डी मारणे, जिल्हाअध्यक्ष संपतराव तनपुरे, मुळशी तालुका अध्यक्ष पांडुरंग मारणे व गटशिक्षणाधिकारी संग्राम पाटील यांच्यासह विविध मान्यवर व पेन्शन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments