Homeसाहित्य/शैक्षणिकपुणे/उपनगरस्वर्गीय धनंजय तुकाराम दाभाडे यांच्या स्मरणार्थ श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे कार्तिकी एकादशी...

स्वर्गीय धनंजय तुकाराम दाभाडे यांच्या स्मरणार्थ श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे कार्तिकी एकादशी निमित्ताने युवा नेते श्री.मधुरशेठ दाभाडे यांच्या वतीने करण्यात आलेली पुष्प सजावट.

पौड प्रतिनिधी

मुळशी:- कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पौड येथील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने स्वर्गीय धनंजय तुकाराम दाभाडे यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देत युवा नेते श्री. मधुरशेठ दाभाडे यांच्या वतीने मंदिरात आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली.

रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक सजावटीमुळे मंदिर परिसराला विशेष प्रसन्न आणि भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले होते. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे लक्ष या सुंदर पुष्प सजावटीने वेधून घेतले. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी परिसरातील तसेच दूरवरून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

स्वर्गीय धनंजय तुकाराम दाभाडे यांच्या स्मरणार्थ करण्यात आलेली ही पुष्प सजावट भाविकांसाठी आकर्षणाचा विषय ठरली. भक्ती, श्रद्धा आणि स्मृती यांचा सुंदर संगम या सजावटीच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण विठ्ठलवाडी परिसर विठ्ठलनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments