Homeसाहित्य/शैक्षणिकपुणे/उपनगरपुणे जिल्हा परिषदेत स्वर्गीय अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन; अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि मुख्य...

पुणे जिल्हा परिषदेत स्वर्गीय अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन; अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि मुख्य प्रवेशद्वाराला नामकरण.

पुणे | प्रतिनिधी

पुणे:-‘ ‘कामाचा माणूस’ म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पुणे जिल्हा परिषदेतील अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि मुख्य प्रवेशद्वाराचे नामकरण आज केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात अजितदादांच्या स्मृतींना कायमस्वरूपी स्थान मिळाले आहे.

पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून अजितदादांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. जिल्ह्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान आणि प्रशासकीय कामकाजातील त्यांची कार्यशैली आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ज्या जिल्हा परिषदेतून जिल्ह्याच्या विकासाच्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना दिशा मिळाली, त्याच प्रांगणात त्यांच्या स्मृती जपण्याचा हा भावनिक क्षण ठरला.

यावेळी उपस्थित आमदारांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अजितदादांनी संधी दिली. आज आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याची जी संधी मिळाली आहे, त्यामागे दादांचा मोठा वाटा आहे. माझ्या राजकीय जडणघडणीत त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून ते मी कधीही विसरू शकत नाही.

या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यासह राज्यातील मंत्री, पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि अजितदादांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments