
पौड (प्रतिनिधी)
पुणे : केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कोथरूड उत्तर मंडलाच्या वतीने रक्तदान शिबिर आणि दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांसाठी धान्य संकलन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या समाजोपयोगी उपक्रमाला उपस्थित राहून रक्तदात्यांचे आणि आयोजकांचे कौतुक केले. रक्तदानातून गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होते, तर दुष्काळग्रस्त नागरिकांसाठी धान्य संकलन हा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम आहे.
वाढदिवसाचे औचित्य साधून समाजहिताला प्राधान्य देणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक एकोपा, सेवाभाव आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.
या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी कोथरूड उत्तर मंडळातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, रक्तदाते आणि अन्नधान्य संकलनासाठी योगदान देणाऱ्या दानशूर नागरिकांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाला कोथरूड उत्तर मंडळाचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बालवडकर, नगरसेविका मयुरी कोकाटे, नगरसेविका रोहिणी चिमटे, नगरसेविका निवेदिता एकबोटे, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, गणेश कळमकर, प्रमोद निम्हण, अनूप मोरे, नवनाथ पारखे, मोरेश्वर बालवडकर, अस्मिता करंदीकर, सचिन दळवी, वंदना सिंग, रोहन कोकाटे, शिवम बालवडकर, वैदेही बापट, महेश सुतार, सचिन सुतार, मनोज दळवी, रघुनाथ उत्पात, स्नेहल सुतार, जागृती विचारे, रीना रायकर, मनाल गायकवाड, स्मृती जैन, प्राजक्ता देवस्थळी, श्रेयस जाधवर, कृष्णा शर्मा, कौशल टंगसळी, धनंजय भजबळ, पार्थ रणपिसे, बालाजी रत्ने, प्रिया अजमेरिया, संजीवनी आवटी, पल्लवी पाटील, श्रद्धा जोशी, सोनाली कलकर्णी, सरिता चोरमले आणि तप्ती जाधव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





