
पौड (प्रतिनिधी)
मुळशी : सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसाने दडी मारल्याने मुळशी तालुक्यातील भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुमारे ८० टक्के भातपीक बाधित झाल्याची माहिती आमदार शंकर मांडेकर यांनी दिली. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून, शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोमवार, दिनांक २ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार मांडेकर यांनी ही माहिती दिली.पावसाच्या अनियमिततेमुळे भातपिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आमदार मांडेकर यांनी सांगितले.
पावसाच्या लहरीपणामुळे शेतीचे नुकसान झालेल्या मुळशीतील शेतकऱ्यांना आता शासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे.





