Homeसाहित्य/शैक्षणिकपुणे/उपनगरसातबारा आणि फेरफार नोंदीसाठी २० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; मुळशीतील घोटावडेच्या महिला...

सातबारा आणि फेरफार नोंदीसाठी २० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; मुळशीतील घोटावडेच्या महिला मंडल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल.

पौड | प्रतिनिधी

मुळशी:-मुळशी तालुक्यातील घोटावडे महसूल मंडळातील महिला मंडल अधिकाऱ्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर आणि फेरफार नोंदी करण्यासाठी तक्रारदाराकडे स्वतःसह तलाठ्याच्या नावाने एकूण २० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यावर आहे.

रोहिणी शशांक गुप्ते (वय ५७), असे गुन्हा दाखल झालेल्या महिला मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने मुळशी तालुक्यातील केमसेवाडी येथे १२ आर क्षेत्राची जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तसेच फेरफार नोंदवहीत नावाची नोंद करण्यासाठी संबंधित महसूल कार्यालयात अर्ज करण्यात आला होता. या कामाच्या मोबदल्यात स्वतःसाठी आणि तलाठ्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये, अशा दोन नोंदींसाठी एकूण २० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी तक्रारदाराने २४ जुलै २०२६ रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २८ जुलै रोजी एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान संबंधित महिला अधिकाऱ्याने स्वतःसाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर १२ नोव्हेंबर २०२६ रोजी पौड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित अधिकाऱ्याला तपासासाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

महसूल विभागातील कामांसाठी लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी अशा प्रकारांना बळी न पडता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments