Homeसाहित्य/शैक्षणिकपुणे/उपनगरकेंद्रीय मंत्री मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक दिलीप वेडे-पाटील यांच्याकडून दुष्काळग्रस्त...

केंद्रीय मंत्री मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक दिलीप वेडे-पाटील यांच्याकडून दुष्काळग्रस्त बांधवांसाठी २ लाखांचा मदतनिधी सुपूर्द!

पौड प्रतिनिधी:-

पुणे:- केंद्रीय मंत्री मा. मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दुष्काळग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या सेवाभावी उपक्रमात पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक दिलीप वेडे-पाटील यांनी सहभाग नोंदविला. यावेळी त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी २ लाख रुपयांचा मदतनिधी धनादेशाद्वारे सुपूर्द केला.

समाजातील गरजू आणि संकटग्रस्त बांधवांना मदतीचा हात देणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. अशा कठीण परिस्थितीत मदतीचा खारीचा वाटा उचलता येणे, हीच खऱ्या अर्थाने समाधानाची बाब असल्याची भावना दिलीप वेडे-पाटील यांनी व्यक्त केली.

सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून भविष्यातही गरजू नागरिकांच्या मदतीसाठी विविध सेवाभावी उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान देत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments