
पुणे:- गणेशोत्सव निमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे ओएचडी डॉ राहुल गेठे यांनी साने गुरुजी तरुण मंडळाला भेट दिली यावेळी त्यांनी गणरायांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी मंडळानी प्रमुख उपस्थित यांचा सन्मान करण्यात आला.
साने गुरुजी तरुण मंडळात साकारलेल्या “रामेश्वर मंदिराचा” भव्य प्रतिकृतीचे आणि देखाव्याचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
यावेळी युवा सेना महाराष्ट्र सचिव किरण साळी, झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष विशाल पवार, मंडळाचे पदाधिकारी श्रीकांत जाधव, अमोल केंगार, बबलू लांडगे, पंकज वैराट, राहुल दुर्वे, योगेश जावीर व मंडळाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते..





