Homeसाहित्य/शैक्षणिकइतरविधान परिषदचे आमदार अमित गोरखे यांचा वाहनाचा नाशिकमध्ये अपघात.

विधान परिषदचे आमदार अमित गोरखे यांचा वाहनाचा नाशिकमध्ये अपघात.

पुणे:- अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आयोजित महामोर्चासाठी नाशिककडे जात असताना विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाला नाशिकमध्ये अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार अमित गोरखे यांच्या वाहनाची दुसऱ्या वाहनाशी धडक झाली. या वाहनामध्ये आमदार अमित गोरखे यांच्यासोबत मारुती जाधव, बाबासाहेब रसाळ, आनंद सुतार, महेश खंदारे तसेच वाहन चालक रामचंद्र जाधव, अंगरक्षक सूरज आणि अभिजीत उपस्थित होते.

या अपघातात आमदार अमित गोरखे हे थोडक्यात बचावल्याची माहिती आहे. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आयोजित मोर्चासाठी जात असताना ही घटना घडल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली.

आमदार अमित गोरखे हे आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ सातत्याने भूमिका मांडत असून, याच विषयासाठी आयोजित नाशिकमधील महामोर्चात सहभागी होण्यासाठी ते रवाना झाले होते. अपघाताचे नेमके कारण आणि वाहनातील सर्वांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments