
नागपूर : चर्मकार सेवा संघाच्या वतीने नागपूर येथे विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. व अनेक क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संत रोहिदास महाराजांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या समता, बंधुता आणि मानवतेच्या संदेशावर प्रकाश टाकला. “मन चंगा तो कठौती में गंगा” या संत रोहिदास महाराजांच्या विचारातून मनाची शुद्धता आणि सद्विचारांचे महत्त्व अधोरेखित होते, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधत समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असा संदेश या विद्यार्थी गौरव सोहळ्यातून देण्यात आला.





