Homeसाहित्य/शैक्षणिकइतरपुण्यातील आळंदी मधील खाजगी कोचिंग क्लासची सहल दिवेआगर येथे पर्यटन साठी गेली...

पुण्यातील आळंदी मधील खाजगी कोचिंग क्लासची सहल दिवेआगर येथे पर्यटन साठी गेली दुर्दैवाने 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू.

पुणे:- रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन-दिवेआगर येथील समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवानं मृत्यू झाला आहे ही घटना समोर आली आहे मात्र विद्यार्थी आळंदी येथील एका खाजगी क्लासच्या सहलीसाठी दिवेआगर येथे आले होते.

प्राथमिक माहितीनुसार आलेल्या 42 विद्यार्थ्यांपैकी 8 जण समुद्रात बुडून मृत्यू मुखी पडले हे सर्व विद्यार्थी आळंदी येथील विनर्स अकॅडमी या खाजगी क्लासमध्ये विद्यार्थी होते किनारपट्टीला सुरू असलेला हलक्या पावसामुळे आणि हवेच्या दाबामुळे समुद्री लाटांचा वेग वाढला होता या सर्व स्थितीच्या अंदाज न आल्याने हे विद्यार्थी खोल समुद्रात लाटण बरोबर ओढले गेले आणि यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

(गुरुवारी 1ऑक्टोंबर) सायंकाळी पावणे सहाच्या सुमाराची ही दुर्घटना घडली. दिवेआगर येथील या सहलीला आळंदी येथून 25 मुले १७ मुली आणि दोन शिक्षक आले होते यातील विद्यार्थिनी पाण्यात उतरले नव्हते मात्र 8 विद्यार्थी पाण्यात उतरलेत तथापि त्यांना पोहता येत नव्हते स्विमिंग पूल नदी यापेक्षा समुद्राच्या पाण्याचा लाटांचा वेग हा अधिक असतो याची त्यांना कसलीही कल्पना नव्हती.

यामुळे हे विद्यार्थी खोल समुद्रात ओढले गेले स्थानिक नागरिक प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य सुरू केले या बुडालेल्या सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी बोरली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यात आली होते मात्र उपचार पूर्वीच मृत्यू झाले असे डॉक्टरांनी घोषित केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments