Homeआरोग्यमहात्मा गांधी जयंतीनिमित्त मुळशी तालुक्यातील पौड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त मुळशी तालुक्यातील पौड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

पौड:- महात्मा गांधी जयंती निमित्त मुळशी तालुक्यातील पंचायत समिती व शेतकरी संघाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले व
” आपला मुळशी स्वच्छ मुळशी” हा उपक्रम तालुक्यातील गावोगावी राबवण्यात आले.

पौड मधील पंचायत समिती, बस स्थानक, तहसील कार्यालय, परिसर स्वच्छ करण्यात आला. ग्रामस्थांना स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले तसेच घोटावडे, भुकूम, पिरंगुट, भुगाव, गावातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आले तालुक्यातील प्रत्येक गणातून एक गाव निवडण्यास येणार आदर्श स्वच्छता ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याच सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांनी सांगितले.

यावेळी उपसभापती दगडू काका करंजगावणे, सदस्य प्रवीण धनवे, राहुल पवळे, काजल मोरे, ऐश्वर्या वाघमारे, तसेच शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मारणे, राम गायकवाड, भाऊ केदारी, आप्पा ढमाले, महादेव मरगळे, संतोष साठे, जयराम दिघे, दत्तात्रय मारणे, दत्तात्रय तुपे व ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments