Homeताज्या बातम्याताम्हिणी घाटात ट्रक आणि चारचाकीचा भीषण अपघात; दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब...

ताम्हिणी घाटात ट्रक आणि चारचाकीचा भीषण अपघात; दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा!

पुणे:- ताम्हिणी घाटात आज, शनिवार दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी चारचाकी वाहन आणि ट्रक यांच्यात मोठा अपघात झाला. या अपघातात ट्रकचा ॲक्सल तुटल्याने ट्रक रस्त्यावरच अडकून पडला. त्यामुळे ट्रक बाजूला हटविण्यात अडथळे निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच पौड पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला केला. मात्र, ट्रक रस्त्यावर अडकल्यामुळे ताम्हिणी घाटातील वाहतुकीचा खोळंबा झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांमुळे अडकलेला ट्रक बाजूला करण्यात आला. अपघातातील जीवितहानी आणि जखमींबाबतची माहिती उपलब्ध झालेली नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments