Homeराजकीयपुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी भाजपची निवडणूक तयारी; संघटनात्मक आढावा बैठक संपन्न.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी भाजपची निवडणूक तयारी; संघटनात्मक आढावा बैठक संपन्न.

पुणे : पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक तयारीला वेग आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे भाजप पुणे ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण नियोजन व आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत दोन्ही मतदारसंघांतील निवडणूक तयारी, मतदार संपर्काची सद्यस्थिती, बूथनिहाय नियोजन आणि प्रचार यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षातील संघटनात्मक समन्वय अधिक प्रभावी करण्यासह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक नियोजन आणि प्रचाराच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक सूचना देत मार्गदर्शन केले. मतदारसंघनिहाय नियोजन, बूथ स्तरावरील यंत्रणा आणि संघटनेतील समन्वय यांना अधिक बळकटी देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

या बैठकीस मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार भीमरावअण्णा तापकीर, आमदार राहुलदादा कुल, आमदार निरंजन डावखरे, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव, पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, डॉ. प्रशांत कोल्हे, धैर्यशील पाटील, प्रदीप कंद, शेखर वडणे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments