Homeअर्थ/उद्योगमुळशी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा ट्रॅक्टर व बैलगाडीच्या सहाय्याने शेतकरी संघाचा मोर्चा;...

मुळशी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा ट्रॅक्टर व बैलगाडीच्या सहाय्याने शेतकरी संघाचा मोर्चा; तहसीलदारांना निवेदन.

मुळशी : तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता मुळशी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, या मागणीसाठी आज तहसीलदार विजयकुमार चोबे यांना निवेदन देण्यात आले.

तालुक्यातील शेतकरी, नागरिक तसेच ग्रामीण भागातील परिस्थितीचा विचार करून शासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच दुष्काळग्रस्त भागासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय सवलती व मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.तसेच ट्रॅक्टर व बैलगाडीच्या साह्याने मोर्चा काढण्यात आला.

यावेळी सर्व पक्षाचे पदाधिकारी, लोकनियुक्त सदस्य, आजी-माजी सरपंच, विविध पदाधिकारी व शेतकरी बांधव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments