Homeताज्या बातम्याश्रीरंग बारणेंवर पुन्हा राष्ट्रीय जबाबदारी; ऊर्जा विषयक स्थायी समितीच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा नियुक्ती.

श्रीरंग बारणेंवर पुन्हा राष्ट्रीय जबाबदारी; ऊर्जा विषयक स्थायी समितीच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा नियुक्ती.

पुणे:- मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यावर संसदेने पुन्हा एकदा महत्त्वाची राष्ट्रीय जबाबदारी सोपवली आहे. संसदेच्या ऊर्जा विषयक स्थायी समितीच्या अध्यक्षपदी बारणे यांची २०२६-२७ या कालावधीसाठी पुन्हा नियुक्ती करण्यात आली असून, ते या समितीचे अध्यक्ष म्हणून सलग तिसऱ्यांदा काम पाहणार आहेत.

ऊर्जा विषयक स्थायी समितीकडून केंद्रीय विद्युत मंत्रालय तसेच नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या कामकाजाचा, धोरणांचा, अर्थसंकल्पीय मागण्यांचा आणि संबंधित विधेयकांचा आढावा घेतला जातो. त्यामुळे बारणे यांच्याकडे सोपविण्यात आलेली ही जबाबदारी संसदीय कामकाजाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

बारणे यांनी यापूर्वीही ऊर्जा विषयक स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना विविध विषयांवरील अहवाल संसदेत सादर केले आहेत. २०२५ मध्येही त्यांनी ऊर्जा समितीचे अहवाल सभागृहात मांडले होते.

मावळमधून सलग तीन वेळा लोकसभेवर निवडून आलेल्या बारणे यांना पुन्हा ऊर्जा समितीचे अध्यक्षपद मिळाल्याने त्यांच्या संसदीय भूमिकेतील सातत्य अधोरेखित झाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments