Homeसाहित्य/शैक्षणिकइतरभावाच्या लग्नासाठी निघाले अन् काळाने गाठले; समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात भुगाव येथील...

भावाच्या लग्नासाठी निघाले अन् काळाने गाठले; समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात भुगाव येथील सोमेट सोसायटीतील जगदाळे कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पुण्याहून जालन्याकडे जाताना कंटेनरला कारची जोरदार धडक; कारचा अक्षरशः चक्काचूर.

पौड | प्रतिनिधी
भावाच्या लग्नासाठी आई-वडिलांना सरप्राईज देण्याच्या आनंदात पुण्याहून जालन्याकडे निघालेल्या जगदाळे कुटुंबाच्या प्रवासाचा समृद्धी महामार्गावर दुर्दैवी अंत झाला. कंटेनरला कारने पाठीमागून दिलेल्या भीषण धडकेत प्रतीक रामकिसन जगदाळे, पत्नी श्रेया प्रतीक जगदाळे आणि मुलगा रुद्रांश प्रतीक जगदाळे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने मुळशी तालुक्यातील भुगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.

शनिवार, २६ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास वेरूळ-दौलताबाद परिसरातील समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक ४४९.५ येथे हा भीषण अपघात झाला.

प्रतीक जगदाळे हे आयटी इंजिनिअर होते. त्यांच्या लहान भावाचे लग्न असल्याने कुटुंबीयांना सरप्राईज देण्यासाठी प्रतीक, त्यांची पत्नी श्रेया आणि मुलगा रुद्रांश कारने पुण्याहून जालन्याकडे रवाना झाले होते. मात्र, लग्नघरातील आनंदात सहभागी होण्यासाठी निघालेल्या या कुटुंबावर वाटेतच काळाने घाला घातला.

समृद्धी महामार्गावर कारची समोरील कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की कारचा पुढील भाग कंटेनरखाली घुसून अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच मदत पथक घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यासाठी कटरच्या सहाय्याने कारचे पत्रे कापण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता.

जगदाळे कुटुंब मूळचे जालना येथील असून गेल्या काही काळापासून मुळशी तालुक्यातील भुगाव येथील सोमेट सोसायटीत वास्तव्यास होते. भावाच्या लग्नासाठी आनंदाने निघालेल्या कुटुंबावर काही तासांतच दुःखाचा डोंगर कोसळला.

एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि चिमुकल्या मुलाचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने भुगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने जगदाळे कुटुंबीयांसह नातेवाईक आणि मित्रपरिवारावर दुःखाचे सावट पसरले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments