
पौड:- मुळशी तालुक्यातील माले गावाजवळील घाटात अवजड वाहनाचा थरारक अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. घाटातील वळणावर अचानक वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अवजड वाहन अपघातग्रस्त झाले.
या घटनेमुळे घाट परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली असून मोठी दुर्घटना होता होता वाचली..
माले घाटातील अरुंद रस्ता, तीव्र वळणे आणि अवजड वाहनांची वाढती वाहतूक पाहता या मार्गावर वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. विशेषतः घाटातील धोकादायक वळणांवर वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे..





