
पुणे:- हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळख असणारे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे या मंडळांनी अनंत चतुर्थीच्या निमित्ताने गणपती बाप्पांची विशेष पूजा सकाळी 7 वाजता पोलीस उपायुक्त ऋषिकेश राहुल आणि आळंदी देवस्थानाचे डॉ. भावार्थ देखणे यांच्या हस्ते होणार आहे.
अनंत चतुर्थीच्या दिवशी होणाऱ्या धार्मिक विधी नंतर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन सोहळ्याची सुरुवात होणार आहे हा सोहळा टिळक पुतळा येथून मिरवणुकीस प्रस्थान सायंकाळी 5 वाजता होणार असून टिळक पुतळा, बेलबाग चौक, शगुन चौक, अलका चौक, व विसर्जन हे पांचाळेश्वर घाटामध्ये होणार आहे..





