
भुकूम:- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुकूम येथील हर्षल मोकाटे यांनी आपल्या घरी गणपती बाप्पांसह गौरीमातेची अत्यंत आकर्षक व कलात्मक पद्धतीने सजावट केली आहे. आकर्षक फुलांची सजावट, विविध सजावटीच्या साहित्याचा कल्पक वापर आणि सुंदर मांडणी यामुळे त्यांच्या घरातील गणेशोत्सवाचे वातावरण भक्तिमय झाले आहे.
गणपती बाप्पांची सुबक आरास तसेच गौरीमातेची पारंपरिक पद्धतीने केलेली सजावट लक्षवेधी ठरत असून, या सजावटीतून धार्मिक श्रद्धेसोबतच कलात्मकतेची सुंदर अनुभूती पाहायला मिळत आहे.
हर्षल मोकाटे यांनी घेतलेल्या मेहनतीतून साकारलेली ही आकर्षक सजावटीने परिसरातील नागरिकांचे प्रचंड लक्ष वेधले आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून परंपरा, संस्कृती आणि भक्तीचा सुंदर संगम साधत केलेल्या या सजावटीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.





