Homeमनोरंजनउत्कृष्ट गौरीपूजनातून जपली पारंपरिक संस्कृती; सीमा किरण ढोरे यांचे कौतुक

उत्कृष्ट गौरीपूजनातून जपली पारंपरिक संस्कृती; सीमा किरण ढोरे यांचे कौतुक

पौड:- गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर सीमा किरण ढोरे यांनी आपल्या घरी अत्यंत सुंदर व आकर्षक पद्धतीने गौरीपूजनाचे आयोजन केले. पारंपरिक पद्धतीने केलेली गौरीची आरास, आकर्षक फुलांची सजावट आणि पूजेची केलेली सुंदर मांडणी यामुळे या गौरीपूजनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

गौरीमातेची आकर्षक सजावट, विविध फुलांची आरास, पारंपरिक वस्तूंची मांडणी तसेच नैवेद्याची केलेली सुंदर तयारी यामध्ये त्यांच्या कलात्मकतेची आणि धार्मिक श्रद्धेची झलक पाहायला मिळाली.

या गौरीपूजनाच्या निमित्ताने कुटुंबीय, नातेवाईक आणि परिसरातील महिलांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. सुंदर आणि पारंपरिक पद्धतीने केलेल्या या गौरीपूजनाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

आजच्या आधुनिक युगातही पारंपरिक सण-उत्सव, संस्कृती आणि रूढी-परंपरा जपण्याचे काम अशा उपक्रमांतून होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments