
मुळशी:- कासार आंबोली परिसरातील मुख्य रस्त्यावर एकटी आणि घाबरलेल्या अवस्थेत आढळलेल्या चिमुकलीला पौड पोलीस ठाण्याच्या मदतीने सुखरूप तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. या कामी पौड पोलीस ठाण्याचे गायकवाड साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले.
मुख्य रस्त्यावर चिमुकली एकटीच आढळल्याने तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर संबंधित नागरिकांनी तत्परता दाखवत पोलिसांना माहिती दिली. पौड पोलिसांच्या सहकार्याने चिमुकलीला तिच्या कुटुंबीयांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले.
या घटनेत नागरिकांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी आणि पोलिसांनी केलेले सहकार्य यामुळे माणुसकीचे दर्शन घडले. चिमुकली सुखरूप आई-वडिलांच्या स्वाधीन झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यासाठी पौड पोलीस ठाणे, गायकवाड साहेब आणि सहकार्य करणाऱ्या सर्व जागरूक नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.





