
पुणे:- कासारसाई–दारुंब्रे येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या २९ व्या गळीत हंगामाचा भव्य शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. केंद्रीय राज्यमंत्री मा.ना. श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
शेतकरी सक्षम, तर सहकार चळवळ मजबूत! हीच विकासाची दिशा असून, शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करणे आणि सहकारी संस्थांना अधिक बळकटी देणे व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य न्याय मिळावा, साखर उद्योगाला नवी ऊर्जा मिळावी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, यासाठी कटिबद्ध आहोत. प्रतिकूल परिस्थितीतही बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न कायम राहील पदाधिकाऱ्यांनी व प्रमुख उपस्थित यांनी या कार्यक्रमात सांगितले.
या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली), ह.भ.प. जालिंदर महाराज मोरे, कारखान्याचे संस्थापक चेअरमन मा. नानासाहेब नवले, खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे, आमदार मा. शंकर जगताप, सुनील चांदेरे, अनिल लोखंडे, बाळासाहेब काशिद, मावळ पंचायत समितीच्या सभापती सुनीता येवले, पुरुषोत्तम महाराज मोरे, अभिषेक बारणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, संचालक, सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





